HW News Marathi
Covid-19

कोरोनाचा कहर ! राज्यात आज ४७ हजारांहून अधिक नवे रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अत्यंत चिंताजनक होत चालली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२ एप्रिल) थोड्याच वेळापूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काही महत्त्वपूर्ण सूचना आणि इशारा दिला आहे. आता राज्याची चिंता आणखीच वाढली आहे. आज जारी झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४७ हजार ८२७ नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात राज्यात तब्बल २०२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे शासन-प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

मुख्यमंत्री आज काय म्हणाले ?

* मुंबईत दरदिवशी ५० हजार चाचण्या. राज्यात दरदिवशी १ लाख ८२ हजार चाचण्या

* राज्यात चाचण्यांच्या संख्येचे लक्ष्य अडीच लाख आहे

* मला अन्य राज्यांबद्दल बोलायचं नाहीये. आम्ही कोरोनाची राज्यातील सत्य परिस्थिती समोर मांडत आहोत.

* राज्यातील एकही कोरोना रुग्ण लपवला नाही आणि लपवणारही नाही.

* RTPCR चाचण्या करण्यावर सरकारचा भर

* फिल्ड हॉस्पिटल उभारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य

* सध्या राज्यात कोरोना चाचण्यांसाठी ५०० पेक्षा जास्त लॅब्स

* राज्यात रुग्णवाढ झपाट्याने. आज कदाचित आकडा ४५ हजारांच्या पार असेल.

* परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या १५ ते २० दिवसांमध्ये राज्यात वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडेल

* राज्यात विलगीकरणाचे बेडस ६२% भरलेत

* आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस यांची संख्या कधी वाढवणार ?

* मुंबईतील रुग्णसंख्या दररोज साडेसात ते ८ हजारांनी रुग्ण वाढताहेत

* केंद्राने राज्याला कोरोना लसींचा पुरवठा वाढवायला हवी, आम्ही मागणी करत आहोत.

* लस घेतल्यानंतरही लोक कोरोनाबाधित होतायत. कारण, काळजी घेतली जात नाहीये.

* लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही असे नाही. फक्त त्यांची घातकता कमी होईल.

* रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणीही उपाय सांगत नाही.

* लस घेतली तरी मास्क घालणे अनिवार्य

* लॉकडाऊन करायचा का ? इतर देशांनी काय केलंय

* जीवाशी खेळ नको, कृपया राजकारण नको

* अमेरिकेतही ७ कलमी कार्यक्रम सुरू, ब्राझील, रशिया, फ्रान्स, हंगेरीचीही स्थिती नाजूक

* विरोधकांच्या टीका मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवल्या आहेत.

* टीका करणाऱ्यांनो रस्त्यावरती उतराच ! कोरोनापरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरा

* मास्क न वापरण्यात काय शूरता आहे का ? मुख्यमंत्र्यांचा सवाल

* मी मास्क लावत नाही म्हणे ! नाव न घेता राज ठाकरेंना ता

* येत्या काही दिवसांत राजकीय नेते, पत्रकार, अन्य तज्ज्ञांशी बोलतो. लॉकडाऊनला काही पर्याय आहे का त्यावर चर्चा करतो

* राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येतील

* दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करणार

* स्वयंशिस्तीने ही स्थिती आपण टाळू शकतो.

* आपण गाफील झालो आणि कोरोनाने आपल्याला गाठले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना बैठक सुरु  

News Desk

राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा मोठा ! तर रिकव्हरी रेट 95.48%

News Desk

शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यात कोरोनाचा शिरकाव !

swarit