HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेचा रिझर्व्ह बँकेने परवाना केला रद्द

पुणे | पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने पैसे थकवल्याने रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे.आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने तात्काळ रद्द केला आहे. ही बँक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे. . सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

परवाना रद्द का केला?

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही आहे. तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत देखील नाही आहेत. त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही. यामुळेच बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही. आर्थिक अनियमिततेसह इतर कारणांमुळे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सध्या ही बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली आहे. विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या बँकेच्या 98 टक्के ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे, असंही आरबीआयने म्हटलं आहे.

ठेवीदारांचं पुढे काय होणार?

या कारवाईमुळे बँकेतील 98 टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी ओळखपत्रांसह l आपला दावा सादर करावा, असे सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप!

News Desk

“मोदी मंदिरात दर्शनाला जो येईल त्याला लगेच…”प्रशांत जगतापांची मोदींवर खोचक शब्दात टीका!

News Desk

महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजी, काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर सोनिया गांधींचीही घेणार भेट

Aprna