HW News Marathi
Covid-19

राज्यात आणखी एका जिल्ह्यात दिवसा संचारबंदी

नंदुरबार | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य शासन आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. याचमुळे एकीकडे राज्यात लॉकडाऊनची चर्चा सुरु असताना दुसरीकडे नंदुरबारमध्ये दिवसा संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये आजपासून (१ एप्रिल) १५ एप्रिलपर्यंत दिवसा संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयाच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारमध्ये दुपारी १ वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. तर सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांसोबत काही खाजगी आस्थापने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये लावलेली ही दिवसाची संचारबंदी १ वाजल्यानंतर अत्यंत कडक पद्धतीने पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी देखील नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. “कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीदेखील संचारबंदीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे” असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, एकीकडे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असली तरीही दुसरीकडे वैद्यकीय सुविधांची मात्र वानवाच आहे. जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सध्या बेड्सदेखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे, त्यादृष्टीनेही काही ठोस पावले उचलली जाणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदेव बाबांना उच्च न्यायालयाचे समन्स, ३ आठवड्यांत उत्तर द्या

News Desk

राजभवनातील तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण, राज्यपाल विलगीकरणामध्ये…

News Desk

…नाहीतर मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल !

News Desk