HW News Marathi
Covid-19

राज्यात सध्या लॉकडाऊनलावण्याचा कोणताही सरकारचा निर्णय नाही!

मुंबई | राज्यात कोरोना रूग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर सरकार महत्वाची पावले उचलण्याची तयारी करत आहे. दर्णयनी, राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते टिव्ही ९मराठीशी बोलत होते.

यावेळी त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व प्रश्नांनी सविस्तर उत्तरे दिली. राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त राजेश टोपे यांनी फेटाळून लावले आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल. राज्यातील लोक १५ दिवस गर्दीच्या ठिकाणी गेलेच नाहीत तर कोरोनाची साखळी तुटू शकते. मात्र, त्यामुळे अनेकांच्या रोजगाराची समस्या उद्भवते. परिणामी आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला आहे.

मुंबईसाठी काही वेगळा निर्णय घेणार का?

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईसाठी राज्य सरकार कोणता वेगळा निर्णय घेणार का, असा प्रश्न राजेश टोपे यांना विचारण्यात आला. त्यावर राजेश टोपे यांनी मुंबईसाठी स्वतंत्र नियम होण्याची शक्यता नाकारली. मुंबईत लसीकरण मोठ्याप्रमाणावर होत आहे. तसेच याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असली तरी बेडसची कमतरता नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ३० हजारांच्या आत आढळले नवे रूग्ण तर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ४० हजारांवर

News Desk

नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल – हसन मुश्रीफ

News Desk

जाणून घ्या… उद्धव ठाकरे यांच्याकडे किती आहे संपत्ती !

News Desk