HW News Marathi
Covid-19

राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्यसरकार कटीबध्द!

पुणे | कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक पात्र नागरीकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे, असे सांगतानाच पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला आहे.

राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.हडपसर येथे पहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिनित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तीनिशी लढत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे.

लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात आली असून येथेही लवकरच लसीचे उत्पादन सुरू होईल, या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरातील हडपसर येथे सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करतो आहोत, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थिती बेसावध राहून चालणार नाही, राज्य शासनानेही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संगर्सजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना देत आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना हॉटस्पॉट भागातील सर्वाधिक रुग्ण बरे, तर आतापर्यंत ७६८८ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk

दिलासादायक! पुण्यात बऱ्याच दिवसांनी कोरोना बधितांची संख्या ३ आकडी

News Desk

लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही….! आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती

News Desk