HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर महिलेने केला बलात्काराचा आरोप,तृप्ती देसाईंनी पीडीतेला आणले समोर…

पुणे | राज्यात नेत्यांकडून महिलांवर अत्याचार करण्यात येण्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधातही बलात्काराची तक्रार केली होती. आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता या आरोपांमध्ये अडकला आहे. परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.

पीडितेचा आरोप काय?

“माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला आहे. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला.

कोण आहेत राजेश विटेकर?

  • ३९ वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष
  • सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
  • परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक
  • परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक
  • शिवसेना उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव
  • ४ लाख ९६ हजार ७४२ मतं मिळवत विटेकर दुसऱ्या क्रमांकावर
  • ५.३ कोटी रुपयांची संपत्ती, तर ८.७ लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख

महाविकास आघाडी सरकारवर आरोप

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंदू काका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खा. अशोक चव्हाण

News Desk

विखे पाटील-बाळासाहेब थोरात एकमेकांवर टीका, नंतर एकाच सोफ्यावर बसून गप्पा

News Desk

फडणवीसांनी खालच्या स्तरावर राजकारण केलं, खडसेंचा गंभीर आरोप

News Desk