HW News Marathi
महाराष्ट्र

हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर एण्डोस्कोपी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. लवकरच ते रिकव्हर होतील. तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत शरद पवार यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले आहे. ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार! शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपेंना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!’, असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

काल (३० मार्च) संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्आच दिवशी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परब यांना तिसरा धक्का! राज्यपालांनी दिले हे आदेश

News Desk

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा! – अब्दुल सत्तार

Aprna

“मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna