HW News Marathi
महाराष्ट्र

“डिपॉझिट जप्त होऊनही माझी आमदार होण्याची इच्छा पूर्ण झाली”

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षांकडून आपापला उमेदवार जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणूकीतही राष्ट्रवादी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार का? की खेळ पलटणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमिवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. ते आज (३० मार्च) भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान बोलत होते.

“बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. माझी आमदार होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तशीच इच्छा समाधान अवताडेंची आहे, त्यांची इच्छाही पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल”, असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. ते पंढरपुरात बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे पुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे.

डिपॉझिट जप्त होऊनही मी आमदार

बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. मला चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीसांनी आमदार केलं. मी तीन निवडणुका लढवल्या, तिन्ही हरलो. लोकसभेलाही हरलो. बारामतीत माझं डिपॉझिट जप्त झालं. पण माझी आमदार होण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच मला आमदारकी मिळाली. पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंचीही तशीच इच्छा आहे. त्यांनाही आमदार व्हायचं आहे. मला खात्री आहे, पंढरपूरच्या या भूमीत यावेळी त्यांची ही इच्छा पूर्ण होईल, असं गोपीचंद पडळकर यांनी नमूद केलं.

‘ही निवडणूक भारत नानांविरोधात नाही’

पडळकर म्हणाले, ‘ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे. ज्यांनी १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारत नानांना शांती मिळायची असेल, तर मविआ सरकारविरोधात मतदान करा”

बारामती विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान मोडीत काढलं होतं. भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त केलं होतं.

बारामती विधानसभेचा निकाल काय होता?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हानमोडीत काढलं होतं भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त झालं. अजित पवार यांना एकूण १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना केवळ ३० हजार ३७६ मते मिळाली. अशाप्रकारे अजित पवार तब्बल १,६५,२६५ मताधिक्याने विजयी झाले.V

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, ७४२ महिला उत्तीर्ण

News Desk

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही! – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Aprna

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका

News Desk