HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूरात भाजपला धक्क्यावर धक्के, ‘या’ मोठ्या नेत्याला झाला कोरोना

पंढरपूर | पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. मात्र आता भाजपच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची बाधा झाली आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यांनंतर त्यांची चाचणी केली असता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. निवडणुकीच्या प्रमुख शिलेदारालाच विलगीकरणात जावे लागल्याने भाजपाला आणखी एक धक्का मानला जात आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

आधी कल्याण काळेंचा धक्का

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशावेळी भाजपला एक मोठा धक्का बसलाय. कारण कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत आहेत. उद्या (८ एप्रिल) ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

मोहिते पाटील पितापुत्र भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शहा-मोदींकडे आमचं कामच नव्हतं’, चंद्रकांत पाटलांचं पत्रकार परिषदेत विधान!

News Desk

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं”,मुनगंटीवारांनी डिवचलं!

News Desk

नोटाबंदीनंतर बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीसांची सुरक्षा!; मलिकांचा गंभीर आरोप

News Desk