HW News Marathi
व्हिडीओ

खासदार संभाजीराजे आज राजीनामा देणार ? मोठा निर्णय काय असू शकतो ?

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात असंख्य घडामोडी घडायतं.भाजपच्या नेत्यांनी दौरे चालु केलेत तर खासदार संभीजीराजे ही नेत्यांच्या भेटीगाठी घेतायतं. खासदार संभाजीराजे आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, संध्याकाळी संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यव्यापी दौरा केला. त्यानंतर विविध संघटना आणि पक्षप्रमुखांची भेट घेतली. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना भेटून आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र, यावेळी संभाजीराजे आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करु शकतात, असे म्हटले जात आहे.त्याबाबत अधिकृत माहिती नसली, तरी राजकीय वर्तुळात या चर्चेने जोर धरला आहे.

#SambhajiRaje #MarathaReservation #UddhavThackeray #SharadPawar #RajThackeray #VinayakMete #ChandrakantPatil #DevendraFadnavis #AshokChavan
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kolhapur Mutton News | कोल्हापूरकरांचा जीव की प्राण ‘मटण’

swarit

नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्याच्या निर्णयावर सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया!

News Desk

पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk