HW News Marathi
Covid-19

चंद्रकात पाटलांचा रात्रीवरच जास्त भरोसा !  जयंत पाटलांनी डिवचले

मुंबई | “महाविकास आघाडी सरकार सगळे झोपेत असतानाच कोसळेल” या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणले कि, “चंद्रकात पाटील यांचा रात्रीवरच जास्त भरोसा असतो.” दरम्यान जयंत पाटील यांच्या या टोल्यावर आता चंद्रकांत पाटील पुन्हा काही विधान करणार का ? हे पाहणे आवश्यक आहे,

“शरद पवार व मुख्यमंत्री यांच्या भेटीत काय झालं मला माहीत नाही. मात्र सरकारच्या अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. हे विषय येतच असतात. चालूच असतात…समाजात नवे प्रश्न तयार होत असतात त्याचा आणि अस्थिरतेचा काय संबंध ?”, असे सवाल करत महाविकासआघाडी सरकार पडणार असल्याच्या चर्चांना जयंत पाटील यांनी फूलस्टॉप देणायचा प्रयत्न केला आहे. तसेच या वावड्या उठवण्याचं काम आणि कारस्थान करणाऱ्यांना पत्रकारांनी पहिला प्रश्न विचारावा असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.

“मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी यांनी संसदेत निर्णय करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व केंद्राच्या हातात आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात फिरण्याऐवजी दिल्लीत फिरले तर उपयोग होईल”, असाही टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले जयंत पाटील ?

“लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित आली आहे. त्यामुळे चांगला फायदा प्रत्येक जिल्ह्यात झाला आहे. मी काही लॉकडाऊनच्या निर्णयावर थेट भाष्य करणार नाही मात्र याचा अर्थ असा नाही की, लॉकडाऊन कायम केला पाहिजे. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न तयार झाला आहे. बर्‍याच ठिकाणी उपलब्ध सुविधा आता पुरायला लागल्या आहेत. एवढी रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊनबाबत निर्णय किंवा भाष्य करणं योग्य राहणार नाही. कोरोना स्थितीबाबत मंत्रीमंडळात दर आठवड्याला चर्चा होते आणि आवश्यक ते निर्णय घेतले जातात”, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या कोरोना लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या, भाजप खासदाराची मागणी!

News Desk

कोरोनाचे आव्हान कायम ! कुठेही गर्दी, नियमांचे उल्लंघन चालणार नाही । मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

ओमायक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय! – राजेश टोपे

Aprna