HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना कॉंग्रेसच्या नेत्यांकडून जयंतीनिमित्त अभिवादन!

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरपंच ते राज्याचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या प्रदीर्घ राजकीय प्रवासात विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना मिळालेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

समाजकारण, राजकारण, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राजकारणापलिकडे त्यांचे सर्वांशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हेच त्यांचे ध्येय होते. महाराष्ट्राला प्रगतीशील राज्य बनवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. विलासराव देशमुख साहेबांची कारकीर्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा या महान लोकनेत्याला जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

News Desk

SushantSinghCase : ज्यांनी महाराष्ट्राची आणि पोलिस दलाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार

News Desk

महाराष्ट्रातील टोलसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुुसे यांच्या बैठकीत झालेले निर्णय 

Sanjay Jog