मुंबई | भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.
भांडूप पश्चिमेकडे असलेल्या ड्रीम मॉलला रात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय आहे त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भांडूपमधील अग्नितांडवात आतापर्यंत ६१ जणांना बाहेर काढण्यात आले. तर चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईच्या महापौर घटनास्थळी
भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या २० गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले.
महापौरांकडून चौकशीचे आदेश
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
Maharashtra: Fire breaks out at a hospital in Mumbai's Bhandup; rescue operation on
"Cause of fire is yet to be ascertained. I've seen a hospital at mall for the first time. Action to be taken. 70 patients including COVID infected shifted to another hospital," says Mumbai Mayor pic.twitter.com/sq1K29PVhe
— ANI (@ANI) March 25, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.