HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब, पोलीस बदलीच्या रॅकेटचा मांडला तपशील डेटा!

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केल्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब टाकला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर पोलीस दलात बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला.

गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालकांना दिली होती. त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, त्यावर कारवाई होणे तर सोडाच पण उलट रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. आज (२३ मार्च) मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी आपल्याकडे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटविषयी संवेदनशील माहिती असल्याचा दावा केला. ही माहिती खूपच संवेदनशील असल्याने मी ती प्रसारमाध्यमांना देऊ शकत नाही. ही माहिती घेऊन मी केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना भेटणार आहे. या माहितीच्याआधारे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीसांकडे कोणती स्फोटक माहिती?

गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली. पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली.

रश्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. २६ तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली.

मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृहमंत्रालयाने कारवाई करणे सोडाच पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या १० वर, नागरिकांनी घाबरू नये !

swarit

“अहो त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय…” अजित पवारांनी दिला प्रेमळ दम

News Desk

मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही !

News Desk