HW News Marathi
Covid-19

लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरसाठी प्रतिसाद मिळत नाही – राजेश टोपे

मुंबई | एकीकडे रूग्ण संख्या वाढत असली तरी लसीकरण जोरदार सूरु आहे. राज्यातील जनतेचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळत नाही. लसीकरणाबाबतच्या सर्व गोष्टींवर केंद्राचे नियंत्रण आहे. त्यामुळे टेंडरच्या अटी सौम्य केल्या आहेत. २५ तारखेपर्यंत टेंडर भरण्याची सरकारने मुभा दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.

‘लशींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरसाठी एकाही कंपनीचा प्रतिसाद नाही. सध्या केवळ ५ लाख लसी उपलब्ध आहेत. राज्यात २ कोटी दोन लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या पाच कोटींचे टेंडर काढले असून अटीही सौम्य केल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. राज्याला सध्या पाच कोटी लशींची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू आहेत.’

म्युकर मायकोसिस या आजाराबाबत बोलताता टोपे म्हणाले, ‘सध्या या आजाराचे राज्यात ८५० रुग्ण आहेत. म्युकरमायकोसिसवरील इन्फोटेरिसीन बी इंजेक्शन गरजेचे आहे. १ लाख ९० हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. आम्ही केंद्र सरकारशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. राज्यात सध्या म्युकर मायकोसिसचे ५०० रुग्ण बरे झाले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकर मायकोसीसवर उपचार होणार आहेत. तीन लाखांपर्यंत उपचार मोफत होणार आहेत.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील निर्बंध शिथील होणार नाहीत ! बैठकीत तशी चर्चा नाही- राजेश टोपे

News Desk

संकटात पुणे महापालिकेने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली : देवेंद्र फडणवीस

News Desk

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन

News Desk