HW News Marathi
देश / विदेश

सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, UPA ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं – संजय राऊत

नाशिक | देशात भाजपप्रणीत NDA समोर काँग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी आज (२० मार्च) बोलत होते. तसेच, सोनिया गांधी यांनी आत्तापर्यंत युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत. या आधीही शरद पवारांकडे पदाची जबाबदारी द्यावी असं म्हटलं होत.

“देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं राऊत म्हणाले आहेत. “आत्तापर्यंत सोनिया गांधींनी हे नेतृत्त्व उत्तम पणे केलं आहे. पण युपीएची ताकद सध्या कमी झाली आहे. सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतं आहे”, असं राऊत यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : शहीदांना मदत करण्याच्या नावाखाली खोट्या वेबसाईट्सद्वारे मोठी फसवणूक

News Desk

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत !

Gauri Tilekar

 शशिकला समर्थक ई पलानीस्वामीच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

News Desk