मुंबई | बेहिशेबी मालमत्तांप्रकरणी काही महिन्यांपूर्वी ईडीच्या आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी ईडी आणि सीबीआयने लोणावळ्यामध्ये धाडी टाकल्या आहेत. या सगळ्यामुळे प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आता ईडी आणि सीबीआय प्रताप सरनाईकांचा शोध घेत आहे. प्रताप सरनाईक बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. ईडीने आणि सीबीआयने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर धाड टाकली आहे. काहीवेळापूर्वीच दोन्ही तपास यंत्रणांचे अधिकारी या रिसॉर्टवर पोहोचले आहेत. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.
भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. ईडीने सरनाईकांना ताब्यात घेण्यासाठी शोध सुरु केला आहे. याआधी गेल्या वर्षी ईडीने प्रताप सरनाईकांच्या मुलाला ताब्यात घेतले होते.
Pratap Sarnaik GAYAB!!??
प्रताप सरनाईक कुठे आहात!!?? @BJP4Maharashtra— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 18, 2021
किरिट सोमय्यांचे आरोप काय आहेत?
प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले आहेत. OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली असा आरोप सोमय्या यांनी केला.
2008 साली ठामपा ने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडक कारवाईचे आदेश दिले परंतु आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त जात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली यापूर्वी केली होती.
Pratap Sarnaik has bought 78 Acre Land at Titwala from NSEL scam money
His partner Yogesh Deshmukh arrested by ED few week back
Sarnaik's another Partner Mohit Agarwal has siphoned ₹216 crores of NSEL Scam
ED searching Sarnaik for few week
Sarnaik also named in MMRDA scam
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 18, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.