HW News Marathi
Covid-19

संभाजीराजे काय गौप्यस्फोट करणार ? मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याचे दिले संकेत

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतच्या आपल्या अंतिम निर्णयात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला. न्यायालयाने (५ मे) दिलेला हा निर्णय मराठा समाज आणि ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जातो. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली पाहायला मिळत असून टोकाचे आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. मात्र , सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अत्यंत सामंजस्याने आपली भूमिका व्यक्त करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी आता सूचक ट्विट केले आहे. “मराठा आरक्षण प्रश्नांबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन”, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.त्यामुळे, निश्चितच संभाजीराजेंनीची पुढची भूमिका काय असणार ? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना संभाजीराजे म्हणाले होते कि, “मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस आहे. हा निर्णय दुर्दैवी आहे. सर्व सरकारांनी त्यांची बाजू मांडली आहे. मागील सरकारनं कायदा मंजूर केला. सगळ्यांनी बाजू मांडली. मात्र, शेवटी निकाल हा निकाल असतो. २००७ पासून प्रामाणिकपणांन लढतोय. सध्याची परिस्थिती वाईट आहे. कोरोनामुळं लोक मरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. आपलं काम प्रयत्न करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं यातून मार्ग निघतोय का हे पाहावं. यावर अभ्यास होणं गरजेंचं आहे. केंद्र सरकारनं देखील यात लक्ष घालण्याची गरज आहे”, अशीही अपेक्षा संभाजीराजेंनी त्यावेळी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोक्याची; टास्क फोर्सच्या सल्ल्याने अजित पवारांची माहिती

News Desk

देशात गेल्या 24 तासांत 43,733 नवे रुग्ण आढळले

News Desk

कोरोना हॉटस्पॉट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू ॲपचा प्रभावी वापर आवश्यक !

News Desk