HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार प्रताप सरनाईकांच्या शोधासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टवर ED-CBIची धाड

पुणे | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, ED आणि CBI ने याप्रकरणात लोणावळा येथील एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वीच ED आणि CBI चे अधिकारी याठिकाणी पोहोचले असून याठिकाणी सध्या शोधसत्र सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. याबाबत थोड्याचवेळात अधिकृत माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

याआधी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु, नंतर हा तपास काहीसा थंडावला होता. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे याप्रकरणात नवी माहिती पुढे येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

२०२० मध्ये नोव्हेंबर महिन्यात ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. ही चौकशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात आपण ईडीला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.

तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा मुख्यमंत्र्यांकडे रश्मी शुक्लांबाबतचा अहवाल सादर 

News Desk

लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली

News Desk

“पवारांनी MPSC विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली”, गोपीचंद पडळकरांचा आरोप

News Desk