HW News Marathi
महाराष्ट्र

“कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?”, गोपीचंद पडळकरांचा खोचक सवाल 

मुंबई | मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला काळजी घेण्यास सांगितले असून लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या फेसूक लाईव्हवरुन विरोधकांनी टिका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कालचं लाईव्ह कशासाठी होतं असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

“मुख्ममंत्र्यांनी वारंवार लॉकडाऊन आणि बेरोजगारी या दोन गोष्टींचा उल्लेख लाईव्हमध्ये केला हे दुर्दैवी आहे. यामुळे सामान्य जनतेत काय संदेश जातो? आता जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याच काम सरकारनं करु नये. इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि तुम्ही कसला हा लॉकडाऊन – लॉकडाऊन काय खेळ लावला? वर्षभरात काय केलं तुम्ही? एक वर्ष झालं तरी तेच तेच पाल्हाळिक बोलत आहात. कोरोनाचा प्रसार तुम्हाला रोखता आला नाही. हे आतातरी स्पष्टपणे कबूल करा”.

“लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॅाकडाऊन शिवाय करोना नियंत्रणात येईल. पण दरवेळेला जनतेला गृहीत धरुन मनमानी कारभार रेटायचा बंद करा…बरं यातही सगळं लोकांनीच करावं, जनतेनचं रोखाव किंवा जबाबदारीनं वागावं, तर मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबूक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झाला आहात का? जनतेला रस्त्यावर उतरून दाखवा म्हणणाऱ्यांनी आधी खुर्चीवरून उतरून दाखवावं”, अशा खरमरीत शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यानाच सुनावले आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, “सरकारचं सगळं पाप जनतेच्या माथी मारून जनतेलाच ‘बेदरकार’ म्हणायचं, राज्याचे प्रश्न सोडून बंगालमध्ये ममता दिदिनं लावलेल्या ‘दिव्याचं’ कौतुक करायचं आणि महाराष्ट्र सरकारनं केलेल्या अंधारकडं सोयीस्कर दुर्लक्ष करायचं, असं उठसुठ सामानाच्या अग्रलेखातून बरळणाच्या उद्योग सुरू आहे”, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

राज्यावर करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट ओढावलं असून, मागील काही दिवसांपासून डोळे विस्फरायला लावणारी आकडेवारी समोर येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी जगभ्रमणावर, तर शहा देशभ्रमणावर

News Desk

नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!

News Desk

पूरग्रस्त चिपळूणसाठी तब्बल अडीच हजार पुस्तकांची मराठी भाषा विभागाकडून भेट!

News Desk