HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदावर टांगती तलवार?

मुंबई | मुंबईचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचंही गृहमंत्री पद जाऊ शकतं, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. आज (१९ मार्च) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांनी हाताळलं आहे, त्यावरुन पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत.

शरद पवार यांनी मागील काही दिवसांत राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहेत. त्यांनी गृह विभागाच्या कामकाजाविषयी माहिती घेतल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, जर अनिल देशमुखांचं गृहमंत्री पद गेलं तर त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव समोर येत आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले अनिल देशमुख?

मुकेश अंबानी याच्या घरासमोर स्पोटकं सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत असून एनआयएला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पोटकं सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती.

मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं. ते म्हणाले की, “मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागेल!;, शेलारांची बोचरी टीका

News Desk

१०० % उपस्थितीती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

News Desk

‘मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी “ही” कोणाची जबाबदारी ?’

News Desk