HW News Marathi
देश / विदेश

“तुम्ही प्रचाराला येऊ नका”, बंगालमधील कॉंग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने रिंगणात उतरु नये, अशी विनंती काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे बंगालमधील नेते आणि खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी तसे पत्रच शरद पवार आणि ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांना लिहिले आहे. तुम्ही बंगालच्या प्रचारापासून दूर राहावे, अशी विनंतीच या पत्रातून भट्टाचार्य यांनी या दोन्ही नेत्यांना केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकासआघाडीचा भाग आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा विरोधक असणाऱ्या तृणमूलच्या प्रचारास गेल्यास ही बाब काँग्रेस नेत्यांना खटकू शकते.

तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची (राजद) बिहारमध्ये काँग्रेसशी युती आहे. गेल्यावर्षीची विधानसभा निवडणुकीही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली होती. त्यामुळे तेजस्वी यादवही युतीधर्माच्या बंधनात अडकलेले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह २ मेला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगालमधील ही लढाई ममता बॅनर्जी आणि भाजप या दोहोंच्या भविष्यातील वाटचालीच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय अंतराळवीर आता जाणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

Gauri Tilekar

शेतकरी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार

News Desk

शरद पवार दिल्लीत पोहोचले, पवार आणि राजनाथ सिंह यांची भेट

News Desk