HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्मा आता सक्रीयपणे राजकारणात येणार?

मुंबई | महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा, करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे हे प्रकरण जोरदार गाजले होते. राजकीय वर्तृळात त्याचे पडसादही उमटलेले पाहायला मिळाले होते. दरम्यान, करुणा शर्मा ज्यांच्यासोबत असलेले नाते धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते त्यांनी आता राजकारणात येण्याची तयारी दाखवली आहे. करुणा शर्मा आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. मुंबईतील पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करूणा शर्मा यांनी काल (१७ मार्च) मुंबई महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली होती.

स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन करुणा शर्मा महापालिकेत गेल्या होत्या. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी समाजसेविका आहे. राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे”. तसेच त्यांनी अतिरीक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉम सारख्या अॅप्लीकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

वेळ येईल तेव्हा मी सगळ्यागोष्टी पुराव्यासकट बोलेन

” मी सुद्धा २५ वर्षे कधीच घराबाहेर पडले नाही. गेल्या २ महिन्यांपासून मी घराबाबेर पडून बोलायला सुरुवात केली आहे.माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं बोलण्यास कोर्टानं मला मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सगळ्यागोष्टी पुराव्यासकट बोलेन. पूजा चव्हाण असो किंवा इतर कोणतीही मुलगी तिला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासोबत जे जे काही झालं त्यानंतर मी सुद्धा आत्महत्या करणार होते. पण मरण्यापेक्षा मी लढणं पसंत केलं. मी इथुन पुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार ” असंही करूणा शर्मा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे – शाहू महाराज छत्रपतींचा एल्गार

News Desk

सर्वांना प्रवासाची मुभा देण्यास आमची हरकत नाही मात्र… राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण

News Desk

बॉलीवूड अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

News Desk