मुंबई | अंबानींच्या घराजवळ स्फोटकं सापडली. या खळबळजनक घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यानंतर एनआयएने तपास सुरू करत सचिन वाझे यांना अटक केली आहे. या अटकेनंतर ठाकरे सरकारवर भाजपकडून सातत्याने टीका केली जात आहेत. यात भर म्हणून आता विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडून कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाबरोबरच उद्योगपतींना धमकावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला आहे. “एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे,” असा गंभीर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत केला आहे.
जहां एक तरफ #Nagpur जैसे शहरो में #Corona मरीज़ों को भरती करने की भी अस्पतालों मे जगह नही है,वहाँ दूसरी तरफ #Maharashtra सरकार #covid centres में भ्रष्टाचार कर रही है और उद्योगपातियों को डराके उनसे वसूली करने की योजनाए अपने ही कुछ पिट्ठुओं के साथ मिलकर बना रही है #SachinWaze 👎
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.