HW News Marathi
Covid-19

“मुंबईत सध्या तरी लॉकडाउन लावण्याइतकी बिकट परिस्थिती नाही पण…”

मुंबई | मुंबईचे पालकमंत्री आमदार अस्लम शेख यांनी मालाड भागातील तुंगा हॉस्पिटलला आज भेट दिली. वरिष्ठ नागरिकांना दिल्या जात असणाऱ्या लसीकरणाबाबत त्यांनी ही भेट दिली होती. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतही कोरोना प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कालची (१६ मार्च) आकडेवारी पाहिली तर मुंबईत १९२२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. असं असलं तरी मुंबईतील स्थिती बिकट नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. पण कठोर निर्बंध लावले जाणार असल्याचे संकेतही शेख यांनी दिले आहेत.

लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना मुंबईची स्थिती बिकट बनलेली नाही. मात्र, अजून कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊन लावण्यापासून दूर राहू शकतो, असं पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईत अजून कठोर निर्बंध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आज (१७ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक झाली. यात महापाष्च्रात ४५ वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लस द्यावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी कल्याणमध्ये १ जण आढळला कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

GST परिषदेच्या बैठकीत मोठी घोषणा, कोरोनाशी संबंधित वस्तूंवर ३१ ऑगस्टपर्यंत आयात शुल्क माफ

News Desk

लंडनहून १० जण रत्नागिरीत, कोकणाची चिंता वाढली!

News Desk