जळगाव | जळगाव महापालिकेतील भाजपचे २७ नगरसेवक ऐन महापौर आणि उपमहापौर निवडणुकांच्यावेळीच नॉट रिचेबल असल्याने चिंता वाढली होती. त्यात आणखी एका चिंतेची भर पडली आहे. भाजप नेते, आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे महाजन आता दुहेरी संकटात सापडले आहेत.
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी उद्या (१८ मार्च) निवडणूक होत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच भाजपच्या २७ नगरसेवकांचा पत्ता लागत नसल्याने सध्या वातावरण तापलं आहे. त्यामुळे भाजप नेते व संकटमोचक गिरीश महाजन महापालिका राजकारणातले डॅमेज कंट्रोल करण्यात व्यस्त असतानाच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भाजपासमोरील संकट गडद झालं आहे. रविवारी रात्री गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळावर नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान देखील महाजन तापाने फणफणले होते.
गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन यांना ताप होता. सोमवारी ते मुंबईला रवाना झाले होते. तर मंगळवारी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती भाजपच्या पदाधिकऱ्यांकडून मिळाली आहे. महाजन यांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी रुग्णालयातूनच गिरीश महाजन राजकीय सूत्रं हलवत आहेत. तसेच काही नगरसेवकांशी देखील ते संपर्कात असल्याचे समजते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.