HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात बैठका सुरुच, महाविकासआघाडीची आज महत्वाची बैठक होणार!

मुंबई | राज्यात सध्या अनेक घडामोडी सुरुच आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांचे शर्मा प्रकरण या सगळ्या गोष्टी ताज्या असतानाच अंबानी यांच्या घराबाहेर उभी असलेल्या स्फोटकांच्या गाडीने राजकारणच बदलून गेलं. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले आणि राज्यातील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारवर पुन्हा टीका करण्यात आली.

या सगळ्या विषयांवरून गेल्या २ दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरुच आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, गृहमंत्री, या सगळ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरुच असताना आज (१७ मार्च) महाविकासआघाडी सरकारची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेले अनेक दिवस भाजपकडून सरकारवर केले जाणारे आरोप, मंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी अशा अनेक विषयांवर आज चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत बॅगमध्ये सापडला IED बॉम्ब; मोठा अनर्थ टळला

Aprna

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टीं

News Desk

उद्धव ठाकरे अयोध्येत मंदिर बांधतील, आम्ही मशिद बांधू !

swarit