HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC बाबत मुख्यमंत्री लवकरचं मोठी घोषणा करणार!

मुंबई | MPSC ची १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहेच पण महाविकासआघाडी सरकारमधीलकाही नेतेही या निर्णयाचा निषेध करत आहेत.

‘विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, रस्त्यावर उतरू नये. सरकार विद्यार्थ्याच्या भावानांशी सहमत असून लवकरच योग्य निर्णय घेणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना आदेश देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने हाताळा, असंही सांगितलं आहे. राज्याची कायदा सूव्यवस्था बिघडू देऊ नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत असं समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकते’, हे पाहता मुख्यमंत्री लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं समजत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Aprna

चिपी उद्घाटनाला पाहुणे म्हणून येताय… श्रेयावरून राणेंचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचा लोकसभेत धमाका, नवनीत राणा,पुनम महाजन, गिरीश बापट आक्रमक

News Desk