HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे ! पंतप्रधानांकडून कौतुक

मुंबई | देशाप्रमाणेच राज्यासमोरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे आव्हान आहे. मात्र, या आव्हानात्मक स्थितीतही महाराष्ट्र सरकारने चांगली कामगिरी केली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या या कोरोना लढ्याचे कौतुक केले आहे. “महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (८ मे) फोनद्वारे संभाषण झाले. याचवेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे कौतुक केले आहे.

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांच्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानले आहे. “पंतप्रधान आणि केंद्र सरकार या कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्राचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्याच्या पुढील कोरोनालाढ्यासाठी पंतप्रधानांकडे काही मागण्या देखील केल्या आहे. “महाराष्ट्राला ऑक्सिजनच्याबाबतीत अधिक बळ मिळावे”, अशी मागणी करत यासह मुख्यमंत्र्यांनी कोविन अॅपमधील तांत्रिक बाबी आणि लसीकरणाबाबत देखील पंतप्रधांना पत्र लिहिले आहे. तसेच राज्याला 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी नवीन अॅप बनवण्याची राज्याला परवानगी द्यावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

याचसोबत, राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसे तोंड देता येईल याबाबत आपण नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात आज ३१ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत मात्र भाजपचा विरोध

News Desk