HW News Marathi
महाराष्ट्र

“अमृताताई आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो”

मुंबई |काल (८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

‘काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’ , असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

12 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती

News Desk

माझी हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन!; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Aprna

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे! – दादाजी भुसे

Aprna