HW News Marathi
देश / विदेश

जनधन खातेधारकांत महिलांची संख्या ५५ टक्के, केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली | पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत २४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण ४१.९३ कोटी बँक खाते उघडण्यात आले आहेत. त्यामध्ये ५५ टक्के बँक खाते महिलांच्या नावे आहेत. अर्थमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काल (८ मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अर्थमंत्रालयाने अशा अनेक योजनांची आकडेवारी जाहीर केली ज्यामध्ये महिलांचा विकास होत आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितलं आहे की या योजनांमुळे महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महिला या सक्षम होत आहेत. त्यामुळे अनेक महिला या उद्यमी महिला म्हणून समोर आल्या आहेत असंही केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुद्रा योजनेच्या माध्यमातून ६.३६ लाख कोटी कर्ज मंजूर

पंतप्रधान मुद्रा योजनेची माहिती देताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितलं की २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या योजनेच्या माध्यमातून उद्यमी महिलांना ६८ टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. एकूण १९.०४ महिलांच्या बँक खात्यात ६.३६ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

जनधन योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली केली होती. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्याचं लक्ष होतं. कोरोनाच्या काळात नागरिकांना विशेषत: महिलांना सरकारच्या योजनांचा फायदा या जनधन खात्यामुळे झाला. याच योजनेमुळे कोरोना काळात महिलांच्या खात्यावर सरकारकडून पैशांचे थेट हस्तांतर करण्यात आलं. तसेच देशाच्या अतिदुर्गम भागातही जनधन योजनेमुळे सरकारच्या आर्थिक योजना प्रभावीपणे पोहचण्यास मदत झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांची भाषा पदाला शोभणारी नाही, त्यांनी राजकारणाची पातळी सोडू नये! 

Aprna

अजित पवार म्हणतात ‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर दिला मोदींना शब्द

News Desk

सरकार पडेल या आशेने चंद्रकांत पाटील कपडे घालून तयारच असतात !

News Desk