HW News Marathi
देश / विदेश

सरकार पडेल या आशेने चंद्रकांत पाटील कपडे घालून तयारच असतात !

पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२ ऑक्टोबर) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. “सरकार पडेल या आशेने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कपडे घालून तयारच असतात”, असे शरद पवार म्हणाले. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांवर हा निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणाबाबत एक सूचक विधान केले होते. “राज्याच्या राजकारणात ‘वन फाईन मॉर्निंग’ काहीतरी घडेल”, असे विधान चंद्रकांत पाटलांनी केले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. याच चंद्रकांत

पाटील यांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत समाचार घेतला.

शरद पवार पुढे असेही म्हणाले की, “महाविकास आघाडीचं सरकार यशस्वीपणे आपली ५ वर्ष पूर्ण करेल. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना आता साडे ४ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. पण चंद्रकांत पाटील यांच्या या ‘वन फाईन मॉर्निंग’ला माझ्या शुभेच्छा आहेत”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, याचवरून यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा जुंपली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१०% आरक्षणच हवं होतं तर मग मोर्चे आणि बलिदान का दिलं ?”, संभाजीराजेंचा सवाल

News Desk

काबुल येथील सरकारी कार्यालयावर दहशतवादी हल्ला

News Desk

मुंबई जगातील चौथे सर्वाधिक प्रदूषित शहर

swarit