HW News Marathi
देश / विदेश

मला महाराष्ट्र आवडतो !, कंगना राणावतचा पुन्हा यु-टर्न

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. हा वाद अद्याप तरी शमण्याचे चिन्ह नसताना आता कंगनाने यु-टर्न घेत एक नवे ट्विट करत महाराष्ट्राची स्तुती केली आहे. “मला महाराष्ट्र आवडतो. मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी आहे. कारण मला महाराष्ट्र आवडतो”, असे ट्विट कंगनाने केले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302814705568813057?s=20

“मला यश मिळू लागल्यानंतर मोठमोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट ऑफर करण्यात आले होते. मात्र, मी ते सर्व चित्रपट नाकारले. मला प्रचंड प्रमाणात विरोध सहन करावा लागला आहे. तितकाच मोठा स्ट्रगल मी केला आहे. त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो”, असे ट्वीट कंगना राणावतने केले आहे.

नेमके काय घडले ?

“मला मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस अशी उघड धमकी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”, असे ट्विट कंगनाने केले. कंगनाच्या या ट्विटनंतर राज्यातील वातावरण पेटले. सर्वच स्तरांतून कंगनावर टीका झाली. शिवसेना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली. मात्र, त्यानंतर ट्विट करून कंगनाने आव्हान दिले. “मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर अडवा”, असे ट्विट कंगनाने केले. त्यानंतर हे वातावरण आणखी पेटले. एक मुलाखतीत संजय राऊतांनी कंगनाचा ‘हरामखोर मुलगी’ असा वादग्रस्त उल्लेख केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाक प्रकरणी केंद्र सरकार तोंडघशी

News Desk

मनसेचा झेंडा हटवला गेला….मनसैनिक कोणता झेंडा घेणार हाती ?

Arati More

शहीद नायर यांची हृदयस्पर्शी प्रेम कहाणी

News Desk