मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (३ मार्च) बुधवारी खरपूस समाचार घेतला. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. यामध्ये “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवारांना कोपरखळी मारली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवर टीका केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी सरकारच्या धोरणांवर तोंडसुख घेतलं आहे. त्यापैकी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्द्यांवरून आगपाखड केली आहे. मात्र सुधीर मुनगंटीवारांच्या या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट…आणि शेवट असा केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का किंमत! सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश.. देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं”, असं उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या भाषणात म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी देथील टोला लगावला आहे.
अधिवेशनामधील उद्धव ठाकरे यांचं भाषण हे शिवसेनाप्रमुखासारखं होतं. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय प्रश्न उपस्थित केले. राज्यातील विविध प्रश्न आम्ही उपस्थित केले होते. त्यावर मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण ऐकून त्यांनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं, अशी मी ईश्र्वरचरणी प्रार्थना करतो, असं सुधीर मुनगंटीवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.