HW News Marathi
महाराष्ट्र

“आमची अजित पवारांशी ७२ तासांची मैत्री आजही कायम…”, मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य  

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा खडा सामना सभागृहात रंगला आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास सरकार उडाणटप्पू सरकार आहे, करंटं सरकार आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. तसंच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुनगंटीवार यांचा तोल गेला. आज (३ मार्च) अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

सुधीर मुनगंटीवार यांनी आजही ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली.’हे सरकार उडाणटप्पू आहे आणि हा संसदीय शब्द आहे. विधानसभा चमकवण्यासाठी १५ कोटी रुपये आहेत पण गोर-गरीबांसाठी पैसै नाही. कोविड योद्धे म्हणून अभिनंदन करता आणि त्यांना देण्यासाठी ६-६ महिने पैसे नाही हे करंटं सरकार आहे’, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.’आमची अजित पवारांशी ७२ तासांची मैत्री होती पण तरीही मैत्री कायम आहे. पण शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले हा राजकीय लव्ह जिहाद होता’, असा टोला मुनगंटीवार यांनी सेनेला लगावला आहे.

त्यानंतर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि नंतर मी जबाबदार या महाविकास आघाडी सरकारच्या मोहिमेची मुनगंटीवार यांनी खिल्ली उडवली आणि आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. अजित पवार यांनी सभागृहात अशी व्यक्तिगत टीका करू नये, अशी विनंती केली. त्यानंतर अध्यक्षांनी मुनगंटीवार यांचे विधान पटलावरून काढून टाकले.’गुण पत्रिकेत शून्य गुण आणि स्वत:ची पाठ थोपटत आहे. राज्यात ५२१८४ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाचा एकही रुपया वाढला नाही. शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त कोरोनाची भीती, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.’कोरोनाच्या काळात एका खासगी दवाखान्यात 43 लाख रुपये बिल आले. सरकारच्या उदासिनतीमुळे राज्यात मृत्यू वाढले, ही मोठी चूक आहे. निराधारांसाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही सत्तेतून निराधार व्हाल’, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे तर गलिच्छ राजकारण, सुशांत सिंह राजपूत आत्म्हत्येप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी सोडले मौन

News Desk

मोदींवर नाराजीचा प्रश्नच नाही, पण…, खासदार संभाजीराजे म्हणाले…

News Desk

संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल

News Desk