HW News Marathi
महाराष्ट्र

अध्यक्ष महोदय, FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, देवेंद्र फडणवीसांचा झिरवळांना सवाल

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (३ मार्च) तिसरा दिवसही वादळी ठरताना दिसत आहे. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये आज सभागृहात घडलेल्या एका किस्स्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले.

सभागृहाचे कामकाज सुरु असताना विधानसभेचे काळजीवाहू अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक सूचना वाचली. त्यानुसार विधानसभेच्या सदस्यांना फास्टॅगचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ही सूचना वाचताना अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरुवातीला FASTag चा उल्लेख चुकून फॉस्टिंग असा केला.

सभागृहातील सदस्यांनी ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी उर्वरित सूचना घाईघाईत वाचून दाखवली. विधिमंडळाच्या परिसरात आमदारांना फास्टॅग लावण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे झिरवळ यांनी म्हटले.

त्यावर हजरजबाबी देवेंद्र फडणवीसांनी लगेच उभे राहत टिप्पणी केली. अध्यक्ष महोदय, FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना, हे स्पष्ट करा, असे फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

भरणेंकडून ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची घोषणा, फडणवीस विचारतात मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत केली.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तर देत घोळ नसल्याचं सांगितलं आहे, मग मंत्र्यांच्या त्यांच्यावर विश्वास नाही का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वृक्ष लागवडीच्या मुद्द्यावरुन विधानसभेते घमासान पाहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे !

News Desk

“राम्या पोरी पळव…पंकु चिक्की घे…”, राष्ट्रवादीची जोरदार टीका

News Desk

सुशांत प्रकरणी सीबीआय पुढील तपासणीसाठी आज मुंबईत दाखल होणार

News Desk