HW News Marathi
महाराष्ट्र

राहूल गांधीच्या आणीबाणीच्या वक्तव्यारुन राजकारण तापले, भाजपनेही कॉंग्रेसला सुनावले

मुंबई | कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लागू केली होती ती चुकीची असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाल्या आहेत. गुजरातमध्ये २००२ साली झालेली दंगल ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिअ‍ॅक्शन) होती, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले, त्यानंतर गुजरातमध्ये दंगल झाली. त्यामुळे ही एक रिअ‍ॅक्शन म्हणावी लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आज (३ फेब्रुवारी) चंद्रकांत पाटील मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या आणीबाणी ही एक चूक असल्याच्या कबुलीबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आता इतक्या वर्षांना राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं – नवाब मलिक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं म्हटलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने आता भाजपला घेरलं आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.नवाब मलिक यांनी विधान भवनाच्या मीडिया हाऊसमध्ये बोलताना ही मागणी केली आहे.

४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. जर कॉंग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी कॉर्नेल विद्यापीठातील कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी ही चूक असल्याची जाहीर कबुली दिली. आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेविरोधात भाजपचे षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप

News Desk

फडणवीसांच्या संन्यास घेण्याच्या वक्तव्याला राऊतांचं उत्तर!

News Desk

कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे

News Desk