HW News Marathi
महाराष्ट्र

कंगना झाशीची राणी आहे, ती शिवसेनेच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही!

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून सध्या मुंबई पोलिसांवर आरोप केले जात आहेत.मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या कंगना राणौतला शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटकारल्यानंतर भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा तिच्या मदतीला धावून आले आहेत. राम कदम यांनी ट्विट करून म्हटले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेनेतील एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना राणौतला धमकावण्याचे दु:साहस केले आहे.

 

कंगना रणावत हिने मुंबईत येऊ नये, असे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, कंगना मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? कंगना ही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुंतलेले राजकारणी, नेते, अभिनेते अशा सगळ्यांचा पर्दाफाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचे स्वागत करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार तिला धमकी देत आहे, असे कदम यांनी म्हटले.

कंगनाच्या तोंडातून ही नावे निघाल्यास महाराष्ट्र सरकारच अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून तिला धमकी दिली जात आहे. परंतु, कंगना झाशीची राणी आहे. ती शिवसेना नेत्यांच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार नाही, असे राम कदम यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ८,३९० रुग्णांची कोरोनावर मात

News Desk

26 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पथकाला एकनाथ शिंदेकडून 51 लाखांचं बक्षीस!

News Desk

OBC आरक्षणाचा मुडदा पडत होता, मंत्री मोर्चे काढत होते, फडणवीसांचा हल्लाबोल

News Desk