HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ८,३९० रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई। राज्यात करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करोना विषाणू पसरण्याचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर करोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. आज राज्यात ८ हजार ३९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ७५ हजार १० करोना बाधित रुग्णांनी करोना मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ % एवढे झाले आहे. दुसरीकडे आज राज्यात ६ हजार ३८८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात २०८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३ लाख २६ हजार ८१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ७५ हजार ३९० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १२.६७ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात ३ लाख ९८ हजार ३९७ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ५०७ व्यक्ती सांस्थातमक क्वारंटाईनमध्येआहेत. राज्यात ६२ हजार ३५१ रुग्ण सक्रिय आहेत.

आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या

दुसरीकडे देशात सहा दिवसांनंतर पुन्हा एकदा ४० हजारांहून अधिक करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४१,१९५ नवीन करोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर ४९० करोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याआधी ५ ऑगस्ट रोजी ४४,६४३ करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३९,०६९ लोकांनी करोनावर मात केली आहे. तर ४९० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांत देशात करोनाच्या ४४,१९,६२७ लस दिल्या गेल्या आहेत. त्यानंतर लसीकरणाची एकूण संख्या ५२,३६,७१,०१९ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं? त्याचा तपास व्हावा”, कॉंग्रेसची मागणी  

News Desk

राणा दाम्पत्याची एकाच FIR मध्ये सर्व कलम टाकण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या सेवादलाचे नेते कृष्ण कुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna