HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात अखेर सीईटी परीक्षेला मिळाला मुहूर्त !

मुंबई | कोरोना संकटामुळे अनेक परीक्षा रद्द केल्या तर काही पुढे पुढे ढकलण्यात आल्या. राज्यात देखील पुढे ढकलल्या गेलेल्या सीईटी परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यात सीईटी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

१ ते १५ ऑक्टोबर दरम्यान सीईटी घेण्यात येणार असून लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) घेतली जाते. दरवर्षी साधारणतः मे महिन्यात सीईटी होते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे परीक्षा अद्याप होऊ शकलेली नाही.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना देखील सामंत यांनी मागच्या बैठकीत दिल्या होत्या.

बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. बारावीनंतर आणि पदव्युत्तरसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे नियोजन संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे, असे आवाहन सामंत यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB ने भाजप नेत्याच्या मेव्हण्याला सोडलं, ‘त्या’ व्यक्तीचा उद्या पर्दाफाश करणार- नवाब मलिक

News Desk

पुण्याचा ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य अधिकारी

News Desk

सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार! – अजित पवार

Aprna