HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल

मुंबई | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पुढे आले. त्यांनतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात अनेक फोटो, ऑडियो क्लिप वायरल झाल्या. त्यानंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली.

या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणुन काय भूमिका घेणार आणि कायकारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची आजची भेट नाकारली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा वेळ दिली असुन वर्षा बंगल्यावर संजय राठोड आपली पत्नी आणि मेव्हण्यासह पोचले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाटलांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो, पण फटका लगावतो !

News Desk

घरासाठी पीएफची नवी योजना

News Desk

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक! – देवेंद्र फडणवीस

Aprna