मुंबई | पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याता आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली. मात्र त्यांचं हे ट्वीट कुणासाठी आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अधिवेशानाच्या पूर्वीचं निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना दिल्याचं वृत्त आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याच्या चर्चा सुरू असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत संजय राठोड राजीनामा देणार असल्याच्या मुद्द्याककडे अप्रत्यक्षपणे अंगुली निर्देश केले आहेत. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेला फोटो ट्विट केलेला आहे. त्यावर “सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!”, असा मजकूर असलेलं ट्विट केलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.