HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन नाही, ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने शासन-प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होऊ शकतो का ? असाही सवाल उपस्थित होत आहे. अशातच आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॉकडाऊनबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. “महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. मात्र, नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे”, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. ते इंदापुरात बोलत होते. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील जनतेला दिलासा देत नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे.

मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (२७ फेब्रुवारी) इंदापूरमध्ये तातडीने एक आढावा बैठक घेत कोरोना संदर्भातल्या उपाययोजना आणि सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले कि, “कोरोनाचे संकट संपलेले नाही, कोरोना गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटोकोर पालन करण्याची आवश्यक आहे.” त्याचप्रमाणे, इंदापूर शहर आणि तालुक्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश भरणे यांनी पोलिसांना दिले आहेत. याबाबत बोलताना भरणे म्हणाले कि, “कारवाईमुळे अनेक जण नाराज होतील मात्र कोरोना अधिक वाढू नये म्हणून अशी कारवाई करण्याची गरज आहे.”दरम्यान, यावेळी दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील लॉकडाऊनबाबतही महत्त्वाचे विधान केले आहे.

राज्यातील लॉकडाऊनबाबत बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कि, “महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. मात्र, नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक जण शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही. परंतु लोकांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे”, असे भरणे म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापौरांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडली पुण्यातील कोरोनास्थिती

Gauri Tilekar

मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही, ते अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच व्यस्त !

News Desk

साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेनंतर कोरोनाचा कहर ! पोलिस,भाविकांसह ६१ जणांना कोरोना…

News Desk