HW News Marathi
महाराष्ट्र

“माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं” – चित्रा वाघ

नाशिक | भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किशोर वाघ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावर आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

“माझ्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं, असा दावा वाघ यांनी केला. मी न घेतलेल्या कर्जाचंही मुंबै बँककडे चौकशी करण्यात आली होती, कारण मला अडकवायचं होतं”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

पवारांची आठवण होते

५जुलैला माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज मला शरद पवारांची आठवण होते. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारांनी मला बोलावून घेतलं होतं. तक्रारीची कॉपी वाचली आणि तुझा नवरा कशातच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर माझ्या पतीविरोधात केस उभी राहिली, असं त्या म्हणाल्या.

केवळ चित्रा वाघचा नवरा म्हणून माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाच घेताना माझा नवरा घटनास्थळीही नव्हता. ज्यांनी लाच घेतली त्यांची चौकशीच सुरू आहे. पण माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ पूजा चव्हाण प्रकरण लावून धरल्यामुळेच गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने (ACB) किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्यावर असा आरोप केला जात आहे की, त्यांच्याकडे असणारे ९०.२४ टक्के संपत्ती ही बेहिशोबी आहे.

२०१६ मधील एका प्रकरणाच्या तपासादरम्यान ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे किशोर वाघ यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. किशोर वाघ यांच्यावर कलम १३ (१) (इ), कलम १३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध नियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बघून घेईन ! अर्णब गोस्वामींची मुख्यमंत्र्यांना लाईव्ह कार्यक्रमात थेट धमकी

News Desk

…म्हणून अमित शहांचं वजन झालं कमी

News Desk

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

News Desk