HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत ठाकरे सरकार नागरिकांना मोठा दिलासा देणार ? 

मुंबई | देशातील इंधन दरवाढीमुळे विरोधक केंद्रातील मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेले कित्येक दिवस सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती १०० पार गेल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे केंद्र सरकारविरोधात देशात तीव्र नाराजी असताना आता राज्यातील ठाकरे सरकार मात्र नागरिकांना दिलासा देणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत देण्यात निर्णय होऊ शकतो. राज्य सरकारकडून राज्यातील जनतेला हा दिलासा दिला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

मुंबईत गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पेट्रोलचे दर ९७.३४ रुपयांवर स्थिर होते. तर डिझेलचे दर ८८.४४ रुपये इतके झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा दर सद्यस्थिती सर्वाधिक ९९.४५ रुपये इतके आहे. तर काहीच दिवसांपूर्वी परभणीतील पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी देखील पार केली होती. याच पार्श्वभूमीवर, आता राज्यातील ठाकरे सरकार इंधन दरवाढीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दोनच दिवसांत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. यावेळी सरकारकडून याबाबतची घोषणा केली जाऊ शकते.

फडणवीसांनी दिले होते आव्हान

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारने इंधनावरील दर कमी करून राज्यातील दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. “शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्याच्या करापेक्षा केंद्राचा कर जास्त आहे. त्यापेक्षा राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करून पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करून दाखवावेत”, असे आव्हान फडणवीसांनी दिले होते. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर, आता ठाकरे सरकार राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा तयारीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंधूने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये टोकियोत केली कांस्यपदकाची विक्रमी कामगिरी!

News Desk

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

Manasi Devkar

जनावरांसाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा! – दादाजी भुसे

Aprna