HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोडांच्या प्रश्नावर शिवसेना मंत्री सुभाष देसाईंनी जोडले हात

औरंगाबाद | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नविन फोटो आणि ऑडिओ क्लिप बाहेर येत आहे. भाजप सध्या राठोडांच्या विरोधात आक्रमक झाला असून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांनी शिवसेना मंत्री सुभाष देसाई यांना राठोड प्रकरणावर बोलतं करण्याचा प्रयत्न केला मात्र ‘नो कमेंट’ म्हणून त्यांनी कॅमेरासमोर माध्यमांच्या प्रतिनिधींना हात जोडले आणि कुठलीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.

औरंगाबाद शहराच्या दोन दिवस दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान सिडकोतील एमजीएम परिसरात प्रियदर्शिनी उद्यानातील ऑक्सीजन पार्क ची पाहणी केली .त्यानंतर त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यासह आवश्यक असलेल्या बाबींविषयी इंजिनियरशी चर्चा केली व हे काम गतीने करण्यात यावे अशा सूचना नाही यावेळी दिल्या.यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की या उद्यानातील एकही झाड तोडले जाणार नाही. या ठिकाणी नवीन झाडे लावणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले.तसेच संजय राठोड विषयी प्रश्न विचारताच पालक मंत्री सुभाष देसाई यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात धावली मेट्रो, अजित पवारांच्या उपस्थितीत वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर पहिली ट्रायल रन

News Desk

राष्ट्रभक्तीची भावना मनात सतत तेवत ठेवा! – उपमुख्यमंत्री

Aprna

“राणेजी, बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना काढूनही टाकलेलं लक्षात असुदे”- मुख्यमंत्री

News Desk