HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार संजय जाधवांनी राजीनामा दिलाच नाही तर माध्यमांकडे कुठून आला? एकनाथ शिंदेंचा सवाल

मुंबई | शिवसेनेचे परभणीचे नाराज खासदार संजय जाधव यांचं राजीनामा नाट्य संपलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी संजय जाधव नाराज नसल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांनी राजीनामाच दिला नाही, त्यामुळे तो मागे घेण्याचाही विषय येत नसल्याचे म्हटले आहे.

“माझ्यासमोर खासदार संजय जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. त्यांची कामे मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी कुठे जाणवली नाही. त्यांनी कुणाकडे राजीनामा दिला? त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कुठलीही तक्रार किंबहुना नाराजी नोंदवलेली नाही. त्यांच्या मतदार संघातील कामे-विषय मुखमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनाही आपल्या खासदाराच्या कामाबाबतीत काही सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”

“ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार-खासदार आहेत किंबहुना दुसऱ्या पक्षाचे खासदार आहेत त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे सूत्र ठरले आहे. त्याप्रमाणे खासदार संजय जाधव यांच्याबाबत निर्णय करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी केल्या आहेत. संजय जाधव यांची कुणावरही नाराजी नव्हती आणि तशी नाराजी असण्याची कारणंही नाही. मी तिथे होतो. त्यांनी राजीनामा दिलाच नाही, त्यामुळे मागे घेण्याचा विषयच येत नाही. त्यांचा राजीनामा माध्यमांकडे कुठून आला माहित नाही”, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या, छगन भुजबळांनी केली टीका

News Desk

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? मुरलीधर मोहोळांचा राज्य सरकारला सवाल

News Desk

पंकजा मुंडेंवर कोणतंही दबावतंत्र नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

News Desk