HW News Marathi
महाराष्ट्र

“तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?”, रोहिणी खडसेंनी भाजप आमदाराला सुनावले

जळगाव | सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. राजकीय वातावरणही यामुळे तापलं आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच निर्यातबंदी केली असती तर रेमडेसिविरचा तुटवडा भासला नसता. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांची धावपळ होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही खडसे यांच्या या विधानावर पलटवार केला होता. यावरून नाथाभाऊंच्या कन्या रोहिणी खडसे आक्रमक झाल्या असून त्यांनी संतप्त होत राम सातपुते यांनी सुनावले आहे.

काय म्हणाले होते राम सातपुते?

नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी केला. तसेच निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल, असं राम सातपुते यांनी म्हटलं होतं.

रोहिणी खडसे यांचे प्रत्युत्तर

एकनाथ खडसे जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?, तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर सिद्ध करा ना? शामराव फडणवीसी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

राम सातपुते यांचा पुन्हा रोहिणी खडसे यांच्यावर पलटवार

रोहिणी खडसेंच्या या सवालाला राम सातपुतेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ताई मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंच या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं तीच कारवाई झाली ना तेव्हा आणि यामुळेच आपला २०१९ ला मुक्ताईनगर च्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई?, असं राम सातपुतेंनी उत्तर दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा जळगाव येथे झाला अपघात

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

News Desk

प्रिया दत्त काँग्रेसच्या सचिव पदावरून पाय उतार

swarit