HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये ११ जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

अकोला | कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून तो थांबवण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तेथील स्थानिक प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, विदर्भातील तब्बल ११ जिल्ह्यातील प्रवाशांना परभणी जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यता आली आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये परभणीच्या प्रवाशांना प्रवेश नसेल. पूर्व परवानगी घेतल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासासाठी सूट देण्यात येईल. राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून परभणीच्या जिल्हा प्रशासनाने अकोल्यातील बसेसना जिल्ह्यात येण्यास प्रतिबंध घातला आहे.

तसेच, आज (२४ फेब्रुवारी) अकोला शहरातून परभणीला जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत.परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येथील जिल्हा प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी न केल्यास, थेट कारवाई करण्याचे आदेश येथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये विदर्भातील तब्बल ११ जिल्ह्यातील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

तसेच या ११ जिल्ह्यात बसेस तसेच खासगी वाहनाने जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांतून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या तसेच, परभणी जिल्ह्यातून विदर्भातील ११ जिल्ह्यात जाणाऱ्या खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतची माहिती परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर अकोला जिल्हा प्रशासनाकडूनही परभणीत जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. पूर्व परवानगी घेतल्यास अत्यावशक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक! राज्यात आज १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

जाणून घ्या… महाराष्ट्रात चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू तर काय बंद?

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौरा करण्याची शक्यता!

News Desk