HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौरा करण्याची शक्यता!

पुणे | पुण्यात कोरोनाचे संकट सातत्याने वाढत आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या (३० जुलै) पुण्याचा दौरा करण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. इतकेच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करणार आहे. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. तसेच, कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२८ नोव्हेंबरला मोदी पुण्याच्या सीरम  इन्स्टिट्यूटला भेट देणार!

News Desk

राज्यात ६२ लाख ३९ हजार ७३९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप | छगन भुजबळ

News Desk

कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा -अजित पवार

News Desk